Pages

Thursday, 27 March 2008

पावसाळी स्वप्न


माझ असच तर स्वप्न होत की ती असावी,माझ खारघर च घर तिने नी मी मिळवुन सजवलेल असाव...
बाहेर पाउस पडत असावा, इतका पाउस की सगळी मुंबई बंद ह्वावी ,त्या सुंदर स्वप्नांच्या घरात अडकलेले आम्हि दोघे...
तीने आल-वेलचि घालुन मस्त चहा करावा ,माझ्या साठि बेडरूम मध्ये घेउन यावा मी मात्र पुस्तक घेउन लोळत पडलेला असेन...
ती म्हनेल हे काय आज सुट्टि मिळालि आहे नि पुस्तक काय वाचतोस मला वाच ना,मस्त लाजाव मग तिने अवखळ्पने हसाव, मला गुरफ़टवुन घ्याव तिने तिच्या केसांन मध्ये...
तिने माझ्या जवळ याव,आमच्या बलकनितुन दिसनारा पाउस पहात आम्ही बलकनितच त्या काळ्या ओट्यावर बसुन रहाव...
अचानक light जावी जशी नवी मुंबईत नेहमी पावसात जाते..
माझ्या pulsor वरुन मघ आम्हि दोघांनी खारघर च्या त्या सुप्रसिद्ध पांडव कडा झर्या वर जाव हल्लि तिथे पोलिस मामा जाउ देत नाहीत पन लांबुन त्याचा आवाज ऐकावा...
तीने पावसात मला घट्ट पकडाव , मी उगाचच गाडी जोरात पीटाळावी,
खोट खोट तीने रागवाव नी अजुनच माझ्या कुशीत शीराव...
असच काहिस एक स्वप्न आहे.
मग जेंव्हा आम्हि दुपारि भिजुन घरी येउ तेंव्हा मात्र मी किचन चा ताबा घेइन ,मस्त गरम गरम भात आनि दाळ बनविन ,पापड ही ...
इथे UK ला आल्या पासुन इतक तरि मला चांगलच जमत...
दुपारि आमच्या बेडरूम मधुन पाउस बघत बघत झोपी जाव...
असच कही तरि ते स्वप्न असणार अगदि तंतोतंत....
sameer

No comments: