काय झाल तु रागवलि आहेस का माझ्यावर? ..no mails...
मी call नाहि करु शकलो कारन दोन दिवस झाले माझा boss माझ्या बाजुलाच बसत आहे त्यामुळे call नाही करु शकलो आनि माझ्या mobile च credit ही संपत आल आहे ...
मला वाटत तुझी exam चालु आहे म्हनुन तु busy आहेस...
पन राणी अशी रागवु नकोस...
हे लिहित असतानाच तुझा miss call आला, मला वाटत तु घरी जाण्यासाठि बस मध्ये बसली होतीस , मग मी तुला call केला...बर वाटल तुझ्या शी बोलुन...
आणी गाडितले ते फ़ेरीवाल्यांचे आवाज़ ऐकुन ही मज्जा आली...
खरच कीत्ती लहान लहान गोष्टित आनंद असतो नाही...
आपन दुरच्या प्रवासा साठि एस्टी कींवा लक्सरी मध्ये बसतो,
थोड्या वेळाने सुरु होतात काही आवज़
आलीपाकाअ अ अ......
वेफ़रअ अ अ......
पानीईईईई ...मला तर प्रवासात खायल फ़ार मज्जा येते...
रात्री थंडीने गारठत आपन
कुठल्याशा स्टेंड मध्ये उतरतो, मग गरम गरम बटाटे वडा वाल असतो तिथे...त्याचा त्या वड्या बरोबर असते ती फ़ाकडु लसनाचि चटणी...
लिहिताना च आठवली...
आनी मग घसा अजुन थोडा गरम करायला
आल्या चा चहा...
मला तरी हया driver लोकांना त्रास द्यायला फ़ार आवड्त... हे वडे आनी तिखट चटणी खाली की भरपुर
पाणी पीन ही होत मग काय थोड्या वेळाने निसर्गाचा आवज येतो...
मग driver काकांना अगदी गोड आवाज़ात नम्र पणे म्हनायच, please काका
थोड खाली वाका ब्रेक दाबा
जरा गाडी थांबवाना जोरात लागली आहे हो..
त्यातला एखादा वासकन आंगावर येतो, म्हंतो अजुन एक तासाने दुसर मोठ टेशन येनार आहे तिथे करा जाव...
मग आपन आपला चेहरा अगदि गरिब करुन सांगाव.. जितक थांबायच तीतक थांबलो हो काका आता नाहि हो थांबवत...
मग आपले काका दया दाखवुन गाडी थांबवतात...
त्यावेळी ते काका मला खुप कोणीतरी मोठे आहेत अस वाटतात...
पन मग त्यावेळेला फ़क्त मीच माझी वीधि उर्कत नाहि, अजुन गाडीतले सतराशे मानस खालि उतरुन आलेल्या संधिचा फ़ायदा घेतात,
व आपाअपली कामे उरकुन घेतात....
समीर
Thursday, 20 March 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment