Pages

Wednesday, 12 March 2008

देवाघरची फुले

आईच्या कुशीतुन एक बाळ नुकतच जन्मल...
पन त्याला नव्हती काही कर्नासारखी कवचकुन्डळ ..
ईवलेसे ओठ आनि ईवलेसेच नाक ,ईवल्याशा डोळ्यांनीच ते होत पहात ...
आईच्या कुशीत शीरुन ते दुध प्याल पन त्याचे पापे घ्यायला बाकी कुनी नाही आल.



सातव्या महीण्यांची पोटुशी होती तेव्हा आईला होत कळल ..
HIV नामक रोगाने तीला होत छळल ,बाळाला जन्मजात यातना
देन्याशीवाय काहीच नव्हत उरल, तेव्हा तीने त्याला ह्रूदयाशी अगदी घट्ट घट्ट धरल .....
बाळ रांगु लागल तेव्हा आई हे जग सोडुन निघुन गेली......
तीच्या पाटोपाट बापानेही आपली जीवनयात्रा आटोपली....

बाळ अगदी कावरबावर एकट एकट झाल तरीही त्याला कुशीत घ्यायल कुणीही नाही आल...


मग कुनीतरी पुढे होउन एक सोप्पा उपाय काढला त्याच्यासारख्याच मुलांमध्ये त्याला नेउन धाडला ...
आत्ता ही सगळी बच्चे company एकत्र राहुन बोबड्या सुरात गाणी गातात ...
एक दिवस विमानात बसुन पायलेट होउ म्हंतात....
यांच्या पंखाचे बळ जरि असले थोडे स्वपनां ची झेप आहे त्याच्याहि पुढे...
मी गेली भेटायला की धावत येतात कुठुन कुठुन.....
बडबड गीते शीकव म्हंतात दाटिवाटिने ऐटित बसुन .....
यांचासाठि माज़े मन आतल्याआत रडत ...
माझी बाळे मोठि झाल्याचे स्वप्न मला नेहमिच पडत...

सारीका

No comments: