Pages

Thursday, 27 March 2008

पावसाळी स्वप्न


माझ असच तर स्वप्न होत की ती असावी,माझ खारघर च घर तिने नी मी मिळवुन सजवलेल असाव...
बाहेर पाउस पडत असावा, इतका पाउस की सगळी मुंबई बंद ह्वावी ,त्या सुंदर स्वप्नांच्या घरात अडकलेले आम्हि दोघे...
तीने आल-वेलचि घालुन मस्त चहा करावा ,माझ्या साठि बेडरूम मध्ये घेउन यावा मी मात्र पुस्तक घेउन लोळत पडलेला असेन...
ती म्हनेल हे काय आज सुट्टि मिळालि आहे नि पुस्तक काय वाचतोस मला वाच ना,मस्त लाजाव मग तिने अवखळ्पने हसाव, मला गुरफ़टवुन घ्याव तिने तिच्या केसांन मध्ये...
तिने माझ्या जवळ याव,आमच्या बलकनितुन दिसनारा पाउस पहात आम्ही बलकनितच त्या काळ्या ओट्यावर बसुन रहाव...
अचानक light जावी जशी नवी मुंबईत नेहमी पावसात जाते..
माझ्या pulsor वरुन मघ आम्हि दोघांनी खारघर च्या त्या सुप्रसिद्ध पांडव कडा झर्या वर जाव हल्लि तिथे पोलिस मामा जाउ देत नाहीत पन लांबुन त्याचा आवाज ऐकावा...
तीने पावसात मला घट्ट पकडाव , मी उगाचच गाडी जोरात पीटाळावी,
खोट खोट तीने रागवाव नी अजुनच माझ्या कुशीत शीराव...
असच काहिस एक स्वप्न आहे.
मग जेंव्हा आम्हि दुपारि भिजुन घरी येउ तेंव्हा मात्र मी किचन चा ताबा घेइन ,मस्त गरम गरम भात आनि दाळ बनविन ,पापड ही ...
इथे UK ला आल्या पासुन इतक तरि मला चांगलच जमत...
दुपारि आमच्या बेडरूम मधुन पाउस बघत बघत झोपी जाव...
असच कही तरि ते स्वप्न असणार अगदि तंतोतंत....
sameer

Thursday, 20 March 2008

गाडी थांबवाना काका

काय झाल तु रागवलि आहेस का माझ्यावर? ..no mails...
मी call नाहि करु शकलो कारन दोन दिवस झाले माझा boss माझ्या बाजुलाच बसत आहे त्यामुळे call नाही करु शकलो आनि माझ्या mobile च credit ही संपत आल आहे ...

मला वाटत तुझी exam चालु आहे म्हनुन तु busy आहेस...
पन राणी अशी रागवु नकोस...

हे लिहित असतानाच तुझा miss call आला, मला वाटत तु घरी जाण्यासाठि बस मध्ये बसली होतीस , मग मी तुला call केला...बर वाटल तुझ्या शी बोलुन...

आणी गाडितले ते फ़ेरीवाल्यांचे आवाज़ ऐकुन ही मज्जा आली...
खरच कीत्ती लहान लहान गोष्टित आनंद असतो नाही...
आपन दुरच्या प्रवासा साठि एस्टी कींवा लक्सरी मध्ये बसतो,

थोड्या वेळाने सुरु होतात काही आवज़
आलीपाकाअ अ अ......
वेफ़रअ अ अ......
पानीईईईई ...मला तर प्रवासात खायल फ़ार मज्जा येते...

रात्री थंडीने गारठत आपन
कुठल्याशा स्टेंड मध्ये उतरतो, मग गरम गरम बटाटे वडा वाल असतो तिथे...त्याचा त्या वड्या बरोबर असते ती फ़ाकडु लसनाचि चटणी...
लिहिताना च आठवली...
आनी मग घसा अजुन थोडा गरम करायला
आल्या चा चहा...
मला तरी हया driver लोकांना त्रास द्यायला फ़ार आवड्त... हे वडे आनी तिखट चटणी खाली की भरपुर
पाणी पीन ही होत मग काय थोड्या वेळाने निसर्गाचा आवज येतो...
मग driver काकांना अगदी गोड आवाज़ात नम्र पणे म्हनायच, please काका
थोड खाली वाका ब्रेक दाबा
जरा गाडी थांबवाना जोरात लागली आहे हो..
त्यातला एखादा वासकन आंगावर येतो, म्हंतो अजुन एक तासाने दुसर मोठ टेशन येनार आहे तिथे करा जाव...
मग आपन आपला चेहरा अगदि गरिब करुन सांगाव.. जितक थांबायच तीतक थांबलो हो काका आता नाहि हो थांबवत...
मग आपले काका दया दाखवुन गाडी थांबवतात...
त्यावेळी ते काका मला खुप कोणीतरी मोठे आहेत अस वाटतात...
पन मग त्यावेळेला फ़क्त मीच माझी वीधि उर्कत नाहि, अजुन गाडीतले सतराशे मानस खालि उतरुन आलेल्या संधिचा फ़ायदा घेतात,
व आपाअपली कामे उरकुन घेतात....

समीर

Thursday, 13 March 2008

प्रेमा तुझा रंग कसा-१

कालचा दिवस फ़ारच hectic होता...मला एक system deploy करायची होति आनि testing ला ही दयायची होती...आता कुठे मी हया गोर्र्या लोकांच खेळ समजु लागलो आहे ह्याना प्रत्येक गोष्ट perfect लागते त्या शीवाय ह्यांच काही जमत नाहि... हयाना छोट्या छोट्या गोष्टींचे mail करावे लागतात, आणि mail चा स्वरुपात evidance हि ठेवावे लागतात...


आता दोन दिवस सुट्टी आहे मला हया दोन दिवसात काय करायच आहे, पहिल म्हंजे मला भरपुर झोप
काढायची आहे कारन काल रात्री मी उगीचच २ वाजे पर्यंत मस्त रोमेंटिक movie पहात बसलो...
फ़िल्म तर इतकि मस्त होती "Noothing Hill" ...त्या मुळे तो picture अर्धवट सोडवेनाच...
फ़िल्म ची थीम अशी होती....


एक simple साधा ब्रिटीश तरुण, बुक stall चालवत असतो...त्याला पुस्तकांच फ़ार वेड असत..सहज एक
दिवस त्याच्या stall मध्ये होलिवूड ची फ़ार मोठि Actress पुस्तक विकत घेन्या साठि येते,
हा सरळ साधा मानुस तीला काही पुस्तक सुचवतो, अगदि नोर्मल behave करतो तीचाशी...
तीला ही हयाच साधेपन फ़ार आवडत...


जशा सर्व actress असतात तस तीला ही तीच्या life मध्ये रितेपन जानवत असत...
ती actress हया तरुना बरोबेर त्याचा लहान बहीनी चा वाडदीवसाला ला ही जाते...


तिथे एका बागेत त्यांचा जो प्रणय दाखवला आहे तो अनुभव तर शब्दातीत आहे...
एका नकळत क्षणी ती सुंदरी त्याच चुंबन घेते...


त्याला हे सगळ स्वपनवत च वाटत असत...त्या चांदण्या रात्री ती दोघ ही हातात हात घेउण एका बाकावर रात्रभर बसुन रहातात.


पन कुठुन तरी त्या सखीचा जुना unwanted boyfriend उगवतो...


त्या वेळेला तो हिरो ती situation इतकि सुंदर handel
करतो,त्याचा चेहर्या वरचे ते शांततेने हसन...
शांतपने तो तिथुन निघुन जातो, रात्रभर रस्त्या वर भटकत रहातो...
आता तो ही मनातल्या मनात तीला प्रेम करु लागला आहे पन त्याला हि realiti हि माहीत आहे कि ती फ़ार लांब आहे.
अगदि क्षितिजा पलिकडे...
त्याचा डोळ्यातली ती तळमळ ,शुन्यात हरवलेले भाव...सगळ बघतान तो कुठेतरि आपल्याला रीलेट करत जातो...
असे काही दिवस जातत.... एका सकाळी त्याचा घरची बेल वाजते दारात ती उभी असते अगदि साधी नो मकेप पन तरीही तीतकीच सुंदर
..ती त्याला त्या रात्रीचा घटने बद्दल माफ़ी मागते ...पन तो तीला समजावतो की its ok मला माहित
आहे कि तुझ जग हे फ़ार वेगळ आहे..
त्या दीवशी
ति त्याचा घरी रहाते, तिचा मनात जे काहि आहे ते सगळ त्याचाकडे open करते...तो हि तितक्याच
शांततेने ते सार काही ऐकुन घेतो...
त्याच रात्री त्या दोघांचा मनातल्या प्रेमाने त्यांच मिलन होत...सकळी सकळी ती ऐव्हडी मोठि नटी आपल्या हया नव्या प्रियकरा साठी चहा बनवुन आनते.
पन न जाने media ला सगळयाचा पत्ता लागतो.ऽनि सकळी सकळी media तिथे पोहचते, सगळा आता पर्यन्त मांडलेला डाव विस्कटुन जातो...
ती त्याचा वर फ़ार फ़ार रागावते, नको नको ते बोलते ति म्हनते तो "you want to be famous,now all the world will say, see this guy he slept with that star"
ती तिथुन निघुन जाते...
पुढे वेळ जात रहातो ...त्या दोघांचा मध्यंतरि काहीच contact नसतो...तो तिला काहि केल्या विसरु शकत नाही, त्याला हे सत्य हि माहित असत कि ति एक चंद्र आहे जो कधिच त्याचा होनार नाहि...
मध्यंतरि तो इतर मुलींना ही भेटतो पन त्याच मन त्याल स्वस्थ बसुन देत नाहि...त्याचि family ही
त्याची खुप काळजी करते...


तो जे मनातल्या मनात तिच विरहाच दुख्ख भोगत असतो, त्याला ही समाधानाचि झालर आहे , कदाचित त्याला माहित असत की हे विरहाचे क्षण त्याचे आता जीवन सोबति आहेत मग त्याना आनंदाने वा समाधानाने का घलाउ नये?....


६ महिन्यांचा काळ उलटतो..ऽनि ति परत UK ची एक फ़िल्म च शुटिंग साठि येते...
त्याचे मित्र त्याला तिला भेटन्या चा सल्ला देतात..पन त्याच मन काहि तय्यार होत नाही...
तो तीला भेटायला जातो तिहि त्याला भेटते ,त्याला wait करायला सांगते...
पन इथे तो तिला तिचा मित्राशी बोलताना ऐकतो.."he was just a friend but don't know why he is here today"...
हे जेंव्हा तो ऐकतो तेंव्हा ही तिथे काहीही गडबड न करता तिथुन निघुन येतो....
पुन्हा सकळि ती त्याचा साठी एक painting घेउन त्याला त्याचा दुकाना मध्ये भेटन्यासाठि येते ,ति त्याला sorry म्हंते...


ति म्हंते की प्रेम आहे तुझ्यावर..
पन मग तो तिला इतकच सांगतो...तुझ नि माझ जग फ़ार वेगळ आहे.
तुमचा जगात प्रेम हा खेळ आहे पण माझ्या साठि ते पवित्र बंधन आहे
माझ मन सारखे सारखे धक्के नाहि पचवु शकत...
तु तर मला तुझ्या मित्रा समोर dismiss केलस....
ति म्हंते कि मग काय मी सर्व जगाल ओरडुन सांगु...
त्या नंतर जे ती बोलते ते मी कधिच विसरु शकनार नाहि...ती म्हनते
"please dont forgate, i am just only other girl, stading in front of boy and asking him to love her"...
ति निघुन जाते परत कधी ही न येन्या साठी...
ति गेल्या वर त्याल realize होत की आपन काय गमाउन बसलोय ते... मग ति US ला fly करन्या आगोदर तिचा प्रेस्स conference मध्ये तो पोहचतो ...तीला प्रशन विचारले जातात कि ति "how long u r staying in UK"
...ती सांगते ति आजच निघनार आहे...
तीला बेकर बद्दल म्हंजे हिरो बद्दल विचारतात, ति म्हंते "just a good friend"
मग आपला हीरो तिला अडखळत विचारतो...तो मुलगा जर तुझ्या कडे परत आला , त्याने तुझ प्रेम स्विकारल तर?...
शांतत...
ति आपल्या PA ला सांगुन मागच प्रशन पुन्हा विचारन्यास सांगते..." how long u r staying in UK?"
and she answered "life long"
and then big smile
मला हि story खुप आवडलि अनि कुठे तरी मनात घर करुन गेलि...
प्रेमाचा अनेक रंगान मधला हा एक रंग...

समीर -मनाशी संवाद साधण्याचा प्रयन्तात.....

Wednesday, 12 March 2008

देवाघरची फुले

आईच्या कुशीतुन एक बाळ नुकतच जन्मल...
पन त्याला नव्हती काही कर्नासारखी कवचकुन्डळ ..
ईवलेसे ओठ आनि ईवलेसेच नाक ,ईवल्याशा डोळ्यांनीच ते होत पहात ...
आईच्या कुशीत शीरुन ते दुध प्याल पन त्याचे पापे घ्यायला बाकी कुनी नाही आल.



सातव्या महीण्यांची पोटुशी होती तेव्हा आईला होत कळल ..
HIV नामक रोगाने तीला होत छळल ,बाळाला जन्मजात यातना
देन्याशीवाय काहीच नव्हत उरल, तेव्हा तीने त्याला ह्रूदयाशी अगदी घट्ट घट्ट धरल .....
बाळ रांगु लागल तेव्हा आई हे जग सोडुन निघुन गेली......
तीच्या पाटोपाट बापानेही आपली जीवनयात्रा आटोपली....

बाळ अगदी कावरबावर एकट एकट झाल तरीही त्याला कुशीत घ्यायल कुणीही नाही आल...


मग कुनीतरी पुढे होउन एक सोप्पा उपाय काढला त्याच्यासारख्याच मुलांमध्ये त्याला नेउन धाडला ...
आत्ता ही सगळी बच्चे company एकत्र राहुन बोबड्या सुरात गाणी गातात ...
एक दिवस विमानात बसुन पायलेट होउ म्हंतात....
यांच्या पंखाचे बळ जरि असले थोडे स्वपनां ची झेप आहे त्याच्याहि पुढे...
मी गेली भेटायला की धावत येतात कुठुन कुठुन.....
बडबड गीते शीकव म्हंतात दाटिवाटिने ऐटित बसुन .....
यांचासाठि माज़े मन आतल्याआत रडत ...
माझी बाळे मोठि झाल्याचे स्वप्न मला नेहमिच पडत...

सारीका