मला माझ्या baik ची खुप आठवन येत आहे...पावसात तिच्यावर बसुन कधी कधी मी पारसीक हिल ला जात असे..बाकि आमच्या नेरुळला मंदिरच मंदिर आहेत आनि तेहि छोट्या छोट्या टेकड्यांवर वसलेली...त्यातल मला पारसिक हिलच राधा-क्रिशनाच मंदिर फ़ार आवडत..कधीहि गर्दि नसते, एक अनमिक शांतता असते...श्रावन महिन्यात तिथे मोहत्सव असतो.
मला वाटत २००६ च्या मोहस्तवात आम्हि plan न करता अनुप जलोटा ऐकला होता...
मी आनि संजय असेच भटकायला एका संध्याकाळि तिथे गेलो होतो खुप छान धुक पडल होत, तिथे गेल्यावर कळल अनुप जलोटा Live गात आहे...
त्यातल्या त्यात मी जरा जास्तच रसिक Category मधला आहे, tickets हि आम्हाला आर्ध्या किमतित दिले तिकडच्या सेवकाने...
पुढचे दोन तास नुसते भारावुन गेलो आम्हि..बाहेरचा पाउस सार्या स्रुष्टिला
भिजवत होता पन अनुप आम्हाला त्यांच्या स्वरानी भिजवित होता...
त्याच जेंव्हा ऐसी लागी लगन मीरा होगयी मगन चालु झाल तो अनुभव इथला न्हवताच मुळि..तो कोनत्या तरि दुसर्या जगातुन आला होता...भारावुन गेलो..
माझ्या सारखा नास्तिक मानुस क्षनासाठि का होइना आस्तिक झाला...
Tuesday, 20 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
"Bike" mhanaychay ka tumhala?
Post a Comment